जनतेज न्युज

आमच्या आग्रही मागणीमुळे मुख्यमंत्र्यांना औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर म्हणावं लागलं-राम कदम

प्रतिनिधी , मुंबई : मुंबई दि.७- सध्या औरंगाबाद शहराच्या नामकरणावरून महाराष्ट्रात मोठा राजकीय वाद रंगलाय.याच वादावर प्रतिक्रिया देत भाजप आमदार राम कदम यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
यावर बोलताना,आमच्या आग्रही मागणीमुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करावा लागला, हा महाराष्ट्राचा विजय आहे,अशी प्रतिक्रिया राम कदम यांनी दिली आहे.
याचसोबत त्यांनी, ‘ही नौटंकी आहे की तुम्हाला खरंच संभाजीनगरचं नामकरण करायचं आहे? जर करायचं असतं तर औरंगाबाद महापालिकेत सत्ता असताना आणि राज्यात तुम्ही सत्तेत बसले असतानाच करायचं होतं.तेव्हा तुम्ही कोणत्या कुंभकरणाच्या निद्रेत होता? असा सवाल आमदार राम कदम यांनी उपस्थित केला आहे.