प्रतिनिधी , शिर्डी; रिक्षावरील चालक नेहमी वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे रिक्षा चालवितात मोठ्या प्रमाणात कर्कश आवाज होईल अशा प्रकारे गाणे वाजवत बेधुंद वावरत असतात
राहता शहरांमध्ये राहाता ते शिर्डी मोठ्या प्रमाणावर तीन चाकी रिक्षा अवैध प्रवास वाहतूक करत आहेत यादरम्यान वीरभद्र मंदिर समोर तसेच छत्रपती चौकात अढथळा निर्माण होईल अशा प्रकारे रिक्षा रस्त्यावर उभी करतात
अनेक रिक्षा चालकांकडे लायसन्स नाही तसेच अल्पवयीन मूल वय पूर्ण नसतानाही रिक्षा चालवितात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त आहे याकडे वाहतूक शाखेचे लक्ष का जात नाही असा सवाल नागरिक करत आहे
बेकायदशीरपणे रिक्षा प्रवासी याना शिस्त लावण्यासाठी ड्रेसकोडे लायसन्स मोटार कायद्यातील अटी नियमांचे पालन करणे खूप गरजेचा आहे प्रशासनाचा धाक ह्या चालकानावर राहील अशा प्रकारे कार्यवाही करावी
शहरातील विविध संघटना सुज्ञ नागरिक यांच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे
