जनतेज न्युज

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ‘त्या’ ट्विटचं कारण शोधू-अजित पवार

प्रतिनिधी , मुंबई : मुंबई दि.७- औरंगाबाद शहराच्या नामांतरावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे.याविषयी बोलताना आम्ही तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून चर्चा करू आणि त्यानंतर आपला निर्णय जाहीर कअरू,अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

याचसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख केला,यावर सुद्धा अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. याविषयी बोलताना अजित पवार यांनी ‘त्या’ ट्विटचं कारण शोधू,असं मत मांडलं आहे.

याचसोबत तीन पक्ष एकत्र असल्यामुळे मत-मतांतरे असणार,त्यामुळे यावर चर्चेतून मार्ग काढू,असे अजित पवार यावेळी म्हणाले.