जनतेज न्युज

प्रस्तावित,94वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला होणार, हे जवळपास निश्चित मानलं जातंय.

प्रतिनिधी ,साहित्य महामंडळाच्या स्थळ पाहणी समितीनं आज नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटी परिसराची पाहणी केली.याची औपचारिक घोषणा उद्या औरंगाबादला होणाऱ्या बैठकीनंतर केली जाण्याची शक्यता आहे.
नाशकात, साहित्य संमेलन भरण्याची ही तिसरी वेळ निश्चित होईल असे संकेत आज या पाहणी समितीच्या सदस्यांकडून मिळताय.दिल्लीनंही जरी मागणी केली असली तरी स्थळ पाहणी फक्त नाशिकलाच केल्याचं,या समिती सदस्यांनी स्पष्ट केलंय.या परिसरात असलेली नैसर्गिक संपदा, रहिवास आणि कार्यक्रम नियोजनासाठी असलेली मोठी जागा,निमंत्रित आणी आमंत्रित यासह सहभागी प्रेक्षकांना सुलभ व्हावं असं नियोजन करण्याचू, निमंत्रक संस्था लोकहितवादीनं केलेली तयारी यावर या स्थळ पाहणी समितीनं समाधान व्यक्त केलंय.कोरोना पार्श्वभूमीवर,प्रस्तावित साहित्य संमेलन हे सर्व प्रकारची काळजी घेऊन करणार असल्याचा दावाही निमंत्रक संस्थेनं केलाय. आता अपेक्षित निर्णय,उद्याच्या महामंडळ बैठकीत घेणार असं या समितीनं स्पष्ट केलंय.