जनतेज न्युज

“कॉन्स्टेबल फस्ट या संकल्पनेनुसार” कर्मचाऱ्यांनी लावले पोउपनि मोईन खान यांना पदोन्नतीचे स्टार

प्रतिनिधी, जालना : पोलीस अधीक्षक कार्यालयात वाचक शाखेमध्ये कार्यरत असलेले मोईन खान यांना नुकतीच पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती मिळाली आहे. त्या अनुषंगाने आज त्यांचे सहकारी कॉन्स्टेबल यांच्या हस्ते त्यांना पदोन्नतीचे स्टार लावण्यात आले.पोलीस प्रशासनामध्ये खरेतर पदोन्नतीचे स्टार हे वरिष्ठ अधिकारी लावत असतात. परंतु पोलिस महासंचालक यांनी सांगितलेल्या कॉन्स्टेबल फस्ट या संकल्पनेनुसार मोईन खान यांनी आपले सहकारी असलेले कॉन्स्टेबल यांच्या हातून पदोन्नतीचे स्टार लावून घेतले आहे. यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये यावेळी आनंद दिसून आला. औरंगाबाद परीक्षेत्रांचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री.मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी जो पोलीस दलामध्ये मोलाचा केंद्रबिन्दु (दुवा) असलेला पोलीस अंमलदार असतो म्हणजे कॉन्स्टेबल फस्ट त्यांच्या प्रेरणेला आदर्श मनुन आज श्री.मोईन खान यांनी त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार महेंद्र सोनवणे,रोहन बोरसे व महिला कर्मचारी दिक्षा महाबळे यांच्या हस्ते आज पोलीस उप निरीक्षक चे स्टार तसेच फित लावून पदोन्नती स्वीकारली आहे. तसेच त्यांच्या सोबत काम करणारे कर्मचारी व जालना पोलीस दलातून त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.