प्रतिनिधी , जळगाव : बी एच आर पतसंस्थेचे प्रकरण चांगलेच तापले आहे राष्ट्रवादीचे जळगाव चे नेते प्रफुल लोढा यांनी आज जळगाव मध्ये पत्रकार परिषद घेत अनेक मुद्यांना हात घातला आहे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधातील पुरावे शोधण्यासाठी आपले मित्र कोचर यांच्या घरी एकनाथराव खडसे व पारस ललवाणी यांनी पुणे एलसीबीच्या मदतीने खोट्या सर्च वॉरंटचा उपयोग केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल लोढा यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. आज जळगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत लोढा यांनी गिरीश महाजनांना सोडून खडसे, ललवाणी व रामेश्वर नाईक यांना टार्गेट केले.
