जनतेज न्युज

त्या बेरोजगार कामगारांना कामाचे पैसै न मिळाल्याने बेमुदत उपोषणाला सुरुवात

प्रतिनिधी , तेल्हारा : तेल्हारा ते हिवरखेड मार्गाचे काम करणाऱ्या नागपूरच्या कन्स्ट्रक्शन कंपनी अंतर्गत विष्णु एन्टरप्रायजेस मुंबई या कंपनीने बेरोजगार कामगार तरूणांना केलेल्या कामाच्या मोबदल्याची देय रक्कम काही प्रमाणात दिली परंतु उर्वरित रक्कम मात्र अनेक महिण्यांचा कालावधी उलटुनही व वारंवार विनंती करुनही न मिळाल्याने सदर कामगारांवर व परिवारावर उपासमारीची वेळ आल्याने त्रस्त कामगारांनी शासकीय विश्रामगृह तेल्हारा समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली
कामाचे पैसे न मिळाल्याने बेरोजगार तरुण कामगारांनी या प्रकरणी गत ५नोव्हेंबर रोजीच एक निवेदन सादर करुन तहसीलदार तेल्हारा यांना आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला होता कंपनीने आमची दिशाभूल करुन बोअर एरिया उपलब्ध करुन देणे, पिण्याच्या पाण्याच्या कॉन पुरविणे,मजुर पुरविणे,स्वंयपाक करणे,वाहन चालक,अंकलेखक,खानावळ,इत्यांदी कामे करून घेतलीत कामगारांपैकी काहींचे सहा तर काहींचे दहा महीण्यांचे कामचा मोबदला कंपनीने दिला नसल्याचे नमुद आहे