जनतेज न्युज

पाच लाखांसाठी चिमुकल्याचे अपहरण ; पोलिसांच्या सतर्कतेने आरोपी 18 तासात जेरबंद

प्रतिनिधी , सोलापूर : पैसे कमविण्याचा हेतूने सहा वर्षाच्या चीमुकल्याचे अपहरण करणारा सागर कृष्णप्पा गायकवाड यास सोलापूर मधील विजापूर नाका पोलिसांनी 18 तासांच्या आत जेरबंद केले आहे . अपहरण झालेल्या चिमुकल्याची पोलिसांनी सुखरूप सुटका करून आई- वडिलांच्या स्वाधीन केले आहे . चोरी झालेल्या मोबाईलवरून आरोपीने पाच लाखांची खंडणी मागितली अन तिथेच फसला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला .