प्रतिनिधी , सोलापूर : शहरात मागच्या कांही दिवसापासून विविध चौकातुन दुचाकी वाहने लंपास होत होती त्याचबरोबर घरफोड्यांचे प्रमाण ही वाढले होते,
या दरम्यान सोलापूर सदर बझार पोलीस ठाण्यातील डीबी पथकाने मोठी कामगिरी करत अजय चौगुले यास अटक केले आहे.
अजय चौगुले या संशयित चोरट्याकडून डीबी पथकाने 5 मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत,
यामध्ये हिरो होंडा स्प्लेंडर, ऍक्टिवा, पल्सर, होंडा ड्रीम या दुचाकी गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
तसेच एका घरफोडी मध्ये चोरलेल्या जुन्या काळातील रेडिओ,आणि सॅमसंग कंपनीचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला.
ही कारवाई डीबी पथकाचे पीएसआय संजय राठोड,
पोलीस हवालदार ओमप्रकाश मडवळी,पोलीस नाईक खाजप्पा आरेनवरू यांनी केली आहे.
