प्रतिनिधी , सांगली : धनगर विवेक जागृती अभियानाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करण्यात आलंय. उद्धव ठाकरे सरकारच्या वर्ष पूर्ती निमित्त हे आंदोलन करण्यात आले आहे. धनगर आरक्षण प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी शासनाचा निषेध करण्यात आला आहे.उद्धव ठाकरे सरकारने किमान समान कार्यक्रम जाहीर केला होता त्यात धनगर समाज चे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल होत मात्र महाविकास आघाडी ने वर्षे पूर्ती होत असताना कोणत् ही कृती शील पाउल उचललं नाहीये म्हणून सरकार चा निषेध करण्यासाठी सरकारला जाग आणण्यासाठी निषेध आंदोलन करण्यात आले आहे.धनगर समाजाचा आरक्षण चा प्रश्न सरकारने लवकरात लवकर निकाली काढावा अशी मागणी यावेळी आंदोलन कर्त्यांनी केली..
