जनतेज न्युज

पदवीधर निवडणुकीत संभाजी ब्रिगेड प्रस्थापितांना धक्का देईल; ऍड.पुरुषोत्तम खेडेकर

प्रतिनिधी , कोलापूर : कोल्हापूर पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघात प्रस्थापितांचे प्राबल्य असले तरी, या निवडणुकीत संभाजी ब्रिगेड प्रस्थापितांना धक्का देईल, असा विश्वास मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ऍड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केला. तसेच आगामी लोकसभा, विधानसभा,स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत सर्व जागांवर महिला उमेदवारी उभे करून राज्याच्या राजकारणात प्रवेश करेल. असेही खेडेकर म्हणाले. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुणे पदवीधर मतदार संघाचे संभाजी ब्रिगेडची अधिकृत उमेदवार मनोजकुमार गायकवाड यांच्या प्रचारार्थ निमित्त आज मराठा सेवा संघाचे आणि संभाजी ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष ऍड. पुरुषोत्तम खेडेकर आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. संभाजी ब्रिगेड चे अधिकृत उमेदवार मनोज कुमार गायकवाड यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर खेळू आहे. मात्र काही जण संभाजी ब्रिगेडच्या नावाचा वापर करून पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. हा प्रकार गैर आहे. श्रीमंत कोकाटे यांचे नाव न घेता त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली नाही, मात्र आमच्या पक्षाचा नावाचा वापर करून ते मत मागत असल्याचे खेडेकर यांनी सांगितलं.
यापुढे बोलताना खेडेकर, यांनी राज्याच्या राजकारणात संभाजी ब्रिगेड प्रवेश करत असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा च्या सर्व जागांवर निवडणूक लढवणार आहे. या सर्व जागांवर महिलांना उमेदवारी देणार असल्याचं खेडेकर यांनी सांगितले.