प्रतिनिधी ,नवी मुंबई : कॉर्पोरेट कंपन्या व हॉटेलमध्ये भाडे तत्वावर वाहने घेऊन ती परस्पर परराज्यात विकणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्ष नवी मुंबईला यश, 2 कोटी 2 लाख रुपये किमतीची वाहने हस्तगत…
नवी मुंबईतील नेरूळ येथे हे ट्रॅव्हल्स पॉईंट कंपनीच्या नावाने ऑफिस सुरू करून तेथे भाडेकरार करून भाडेतत्त्वावर मूळ कागदपत्रासह वाहने घेऊन ऑफिस बंद करून फसवणूक करणाऱ्या व त्या वाहनांची परराज्यात विक्री करून फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करण्यास नवी मुंबई गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्ष यांना यश आले असून सुमारे दोन कोटी दोन लाख रुपये किमतीचे वाहने यामध्ये हस्तगत करण्यात आली आहेत.
नवी मुंबई नेरुळ येथे ट्रॅव्हल्स पॉईंट कंपनी स्थापन करून भाडेतत्त्वावर वाहने घेऊन त्याची परराज्यात विक्री करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला नवी मुंबई गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्ष यांनी गजाआड केले आहे संबंधित आरोपी हे सराईत असल्याने त्यांचा ठावठिकाणा मोबाईल क्रमांक शोधणे पोलिसांपुढे एक आव्हान होते. या आरोपींचा शोध घेत असता, सत्यप्रकाश वर्मा उर्फ बाबू हा बोईसर परिसरात असल्याची माहिती मिळाल्याने तेथे जाऊन पोलिसांनी शोध घेतला असता, तेथे त्याची पत्नी राहत होती, तो तिथे आल्यावर पोलिसांनी सत्यप्रकाश याला ताब्यात घेतले, सत्यप्रकाश याला ताब्यात घेण्यासाठी पोलिस पथकाने तो राहत असलेल्या इमारतीत एक रूम भाड्याने घेतला, व दिवसरात्र पाळत ठेवली असता सातव्या दिवशी मोठ्या शिताफीने पोलिसांनी ताब्यात घेतले,व आरोपी राहत असलेल्या ठिकाणी शोध घेऊन,गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली,व त्याला 6 नोव्हेंबरला अटक केले,त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याचे साथीदार आशिष पुजारी व अँथॉनी पॉल हे बेंगलोर मध्ये असल्याचे समजले तेथे पोलीस पथक रवाना करून,7 नोव्हेंबरला त्यांनाही अटक करण्यात आले.नेरुळ पोलीस ठाणे येथील गुन्ह्यात16 वाहनांपैकी 81 लाख किमतीची वाहने गुजरात राज्यातील विविध पोलीस ठाणे, जिल्हाधिकारी कार्यालय यांनी माल तस्करीमध्ये जप्त केली असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे,गुन्ह्याच्या तपासात आत्तापर्यंत 2 कोटी 2 लाखांचा माल हस्तगत करण्यात आला आहे
