प्रतिनिधी, सोलापूर : सोलापुरातील हैदराबाद रोडवरील मंत्री चंडक आंगण येथील हॉटेल व्यावसायिकाच्या बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील तब्बल 08 लाख 55 हजार रुपयांचे दागिने चोरून नेले आहेत.
हा चोरीचा प्रकार काल पहाटेच्या सुमारास उघडकीस आला.
सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक अफसर मोहम्मद शफी खान हे 27 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता मावशीच्या मुलीच्या साखरपुड्यासाठी पुणे येथे गेले होते.
या दरम्यान अज्ञातांनी बंगल्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
घरातील कपाटांमध्ये ठेवलेले दोन लाख 40 हजार रुपये किमतीचे नेकलेस,
2 लाख 40 हजार रुपये किमतीचे दुसरे नेकलेस,
2 लाख 40 हजार रुपये किमतीच्या चार सोन्याच्या बांगड्या,
30 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या,
45 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या,
30हजार रुपये किमतीची चेंज,
30 हजार रुपये किमतीचे कानातील झुमके असे एकूण 08 लाख 55 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.
अफसर खान हे काल पहाटे पुणे येथून सोलापुरात आले.
घरी आल्यानंतर त्यांना बंगल्याच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तुटलेले दिसून आले.
आत जाऊन पाहिले असता त्यांच्या घराचा दरवाजा पुढे करण्यात आलेला दिसून आला. घरात जाऊन पाहिले असता, कपाट फोडून चोरी केल्याचे आणि सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले
घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी एमआयडिसी पोलिसांची संपर्क साधून माहिती दिली.
या प्रकरणी अज्ञातांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
दरम्यान मंत्री चंडक अंगण परिसरातीलच हार्डवेअरचे व्यापारी जुनेस तिम्बसवाला यांचेही घर फोडण्यात आल्याचे निदर्शनास आले.
घरातील कपाट करून चोरट्यांनी लाखो रुपयांचे दागिने चोरून नेल्याचे लक्षात आले या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
