प्रतिनिधी , औरंगाबाद : आज ग्रामपंचायत निवडणूकीची मतमोजणी असल्याने मतमोजणीच्या ठिकाणी नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती होती. यावेळी काही अनुचीत प्रकार घडु नये म्हणून शहरातील होमगार्ड कार्यालय येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी विजयी उमेदवारांना फटाके वाजवण्यास तसेच गुलाल उधळन्यास मनाई करण्यात आली असल्याच सांगितले. उमेदवाराने निवडून आल्यानंतर शांततेत जावे, असा आदेश पोलिसांनी यावेळी सर्व निवडून आलेल्या उमेदवाराला दिला आहे. पण उमेदवारांनी मात्र पोलीसांचे सगळे नियम धाब्यावर बसवत जल्लोष केल्याचे निदर्शनास आले.
