जनतेज न्युज

बुलढाण्यातील चिखली नगर परिषदे विरोधात “भिक मांगो” आंदोलन

प्रतिनिधी , बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली नगरपरिषदे  विरोधात मिझान ग्रुप ने आज भीक मांगो आंदोलन करून नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधलेय.. तर बाबू लॉज चौकापासून ते नगर परिषद पर्यंत अर्धवट सोडलेला रस्ता पूर्ण करण्याची मागणी केलीय. मिझान ग्रुप ने केलेल्या  या भीक मांगो आंदोलन ची चर्चा संपूर्ण शहरात होतेय. चिखली नगर परिषदे  ने मागील दोन वर्षांपूर्वी  बाबू लॉज चौक ते नगर परिषद पर्यंत सिमेंट रस्ता केलाय. मात्र रस्ता करत असताना एका बाजूला जवळपास पाच ते सहा फूट अर्धवट सोडला. यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना , तसेच वाहन धारकांना याचा फार त्रास सहन करावा लागतोय. रस्त्याच्या एका बाजूला वाहने उभी राहत असल्याने नागरिकांना धड चालता ही येत नाहीय. शिवाय याच रस्त्यावर तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, नगर परिषद कार्यालय, शाळा सह अनेक कार्यालय येतात. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. परिणामी अर्धवट रस्ता असल्याने नेहमीच या रस्त्यावर ट्रॅफिक जाम होत असते तर कधी अपघात ही होतात. या सर्व गोष्टींचा विचार केला तर हा रस्ता होणे आवश्यक असून अद्यापही हा रस्ता नगर परिषद ने अर्धवट सोडलेला आहे. मिझान ग्रुपने आज नगर परिषद ला हा रस्ता तयार करण्यासाठी आंदोलन केले असून जर नगर परिषद जवळ  निधी नसेल तर भीक मांगो आंदोलन करून जे पैसे जमा होतील, त्या पैशातून हा रस्ता तयार करावा, अशी मागणी केलीय. एव्हढेच काय जर हा रस्ता केला नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ही यावेळी देण्यात आलाय.