प्रतिनिधी, औरंगाबाद : शंभूनगरच्या गल्ली नं. २, ३ , ४ व 6 येथील नागरिकांना नियमित व पूरेसे पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईन तसेच नवीन ड्रेनेज लाईन व इतर अत्यावश्यक सुविधा देण्याच्या मागणीसाठी शंभुनगर शहानुरमिया दर्गा ते रेल्वे स्टेशन समोरील मनपा झोन क्र 8 येथील मनपा कार्यालयापर्यंत हातात विळा ओम्बीचे लाल झेंडे व रिकामे हंडे घेऊन पदयाञा काढत भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
याबाबत असे की गेल्या अनेक वर्षांपासुन शंभूनगर येथे महानगरपालिका औरंगाबादने पाणी पुरवठा करण्यासाठी जलवाहिनी टाकलेली नाही. हातावर पोट असणार्या सर्व समाजातील कष्टकर्यांना त्यामुळे जारचे पाणी व टॅकरचे विकत घ्यावे लागते. सर्व नागरिकांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. असे असतानाही शंभूनगरकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येते काय? असा सवाल निवेदनाद्वारे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने विचारला आहे. शंभूनगरमधील गल्ली नं. २, ३ , ४ व 6 येथील ड्रेनेज लाईन जवळपास ४० वर्षांपुर्वीची आहे. त्यामुळे ती जागो-जागी फुटलेली असल्याने रॉडने किंवा जेटींग मशीनने तेथील ड्रेनेज चोकअप मनपा कर्मचार्यांना काढता येत नाही, असे अथक प्रयत्नांनंतर मनपा कर्मचार्यांचे मत आहे. परिणामी ड्रेनेज सदर परिसरात रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे या परिसरात अत्यंत दुर्गंधी पसरून लहान मुले, वृद्ध व महिला आजारी पडत आहेत. आपण १० मिनीटे जरी सदर भागात येऊन उभे राहीलात तरी आपले डोके दुखायला लागेल व अजून थोडा वेळ थांबलात तर उलट्या आणि इतर त्रास सुरु होण्याची शक्यता आहे. अशा वातावरणात तेथील रहिवाशी कसे रहात असतील? याची आपण कल्पनाही करू शकणार नाही. त्यामुळे तातडीने नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याची आवश्यकता आहे. वरील दोन्हीही अत्यंत गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष करून उद्यापर्यंत प्रत्यक्ष ड्रेनेजलाईन टाकण्याचे काम सुरु न झाल्यास भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे रोज पदयात्रा काढून निवेदने देण्यात येतील, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनात शंभूनगर येथील गल्ली नं. २, ३ , ४ व 6 येथे उद्यापर्यंत नवीन ड्रेनेज लाईनचे काम सुरु करा. शंभूनगर येथे जलवाहिनी टाकून नियमित व पुरेसा पाणीपुरवठा सुरु करा, शंभुनगरमध्ये अचानक मोकाट कुञ्यांची संख्या वाढली आहे मोकाट कुञ्यांचा बंदोबस्त तातडीने करावा , परिसरात दुर्गंधी पसरल्याने जंतुनाशक पावडर व फवारणी करा , घंटागाडी रोज येईल याची व्यवस्था करा या मागण्यांचा समावेश आहे . यावेळेस सहाय्यक मनपा आयुक्त यांनी अॅड अभय टाकसाळ यांना दुरध्वनीहुन संपर्क साधुन तातडीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. मनपा तर्फे सचिन दसपुते यांनी निवेदन स्विकारले. उद्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्यास परवापासुन रोज पदयाञा काढण्यात येईल असा इशारा भाकपने टेंगळे यांना दिला आहे . यावेळेस ऍड. अभय टाकसाळ (जिल्हा सचिव भाकप) कॉ. राजु हिवराळे (संघटक), जफर खान , रुकसाना खान , पुष्पा गवळी , मंगला रघुनाथ , शेख नसीर , शेख सलीम, शेख जहीर
