जनतेज न्युज

महाशिवरात्री निमित्त सांगली जिल्ह्यातील शिव मंदिरे भक्तांनी फुलली : तीन वर्षांनंतर मंदिर उघडल्याने दर्शनासाठी भाविकांच्या रांगा.

प्रतिनिधी, सांगली : महाशिवरात्री निमित्त सांगली जिल्ह्यातील सर्व शिव मंदिरांमध्ये भक्तांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. दर्शन घेण्यासाठी भक्तांनी पहाटेपासून मंदिरासमोर रांगा लावल्या होत्या. सांगली जवळ असणाऱ्या हरिपूर गावातील संगमेश्वर मंदिरात सकाळपासून गर्दी झाली होती. मंदिर परिसरात आकर्षक फुलांच्या सजावटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. कोरोनाच्या महामारीमध्ये राज्यातील सर्व मंदिरे बंद होती. तीन वर्षानंतर मंदिरे खुली झाल्यानंतर पाहिलीच महाशिवरात्र असल्याने मोठी गर्दी झाली. संपूर्ण हरिपूर गावाला यात्रेचे स्वरूप आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडूनये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.