प्रतिनिधी , मुंबई : मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील 18 माजी नगरसेवकानी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार प्रमाण मानून आणि स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे यांच्या विचारांना माण मानून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे हिंदुत्वाचा विचार अधिक बळकट होण्याला निश्चितच मदत होणार आहे.
यावेळी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, आमदार दीपक केसरकर, आमदार भरतशेठ गोगावले आणि शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
