जनतेज न्युज

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १० कोटी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद

प्रतिनिधी , मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत आहे. या जागतिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपले योगदान म्हणून सर्व विद्यापीठांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करावी असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले होते. याला सकारात्मक प्रतिसाद देत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून 10 कोटी रुपयांचा निधी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठी देण्याचे निश्चित करण्यात आले असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

तसेच उर्वरित विद्यापीठांकडून देखील ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठी मदत म्हणून जाहीर केली जाईल असा विश्वास श्री. सामंत यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.