प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : युकेमध्ये एमडी डॉक्टर असल्याचे सांगून एका कंपनीत मोठ्या पदावर असलेल्या तरुणीला 16 लाखाचा गंडा घातल्याचा प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून ऑनलाइन फ्रॉड उघडकीस आल्यानंतर खडक पाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरू केला आहे.
कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात राहणारी गौरी शर्मा ही तरुणी नवी मुंबई येथील एका खाजगी कंपनीत मोठ्या पदावर आहे. 2017 मध्ये या तरुणीने जीवन साथी डॉट कॉम वर लग्नासाठी रेजिस्ट्रेशन केला होते. तब्बल तीन वर्षानंतर 2020 नोव्हेंबर मध्ये प्रकाश शर्मा नावाच्या एका तरुणाने या तरुणीला संपर्क साधला. तो युकेमध्ये एमडी डॉक्टर आहे. तो गौरी शर्मा हिच्यासोबत लग्न करण्यासाठी तयार आहे असे सांगितले. दोघांमध्ये चॅटिंग च्या माध्यमातून चर्चा सुरू झाली. जानेवारी मध्ये प्रकाश हा भारतात येणार आहे असे त्याने गौरी शर्मा हिला सांगितले. 23 जानेवारी रोजी गौरी शर्माला प्रकाश यांनी फोन करून सांगितले की तो दिल्ली एअरपोर्ट ला आला आहे मात्र त्याच्याजवळ गोल्ड असल्याने त्याला कस्टम ऑफिसरनी पकडले आहे. पैसे भरावे लागतील, आधी त्याने 65 हजाराची मागणी केली, गौरी शर्मा हिने नेट बँकिंग द्वारे प्रकाशला पैसे दिले. त्यानंतर 24 ,25 आणि 26 जानेवारीला काही न काही बतावणी करून प्रकाश शर्मा याने गौरी शर्मा कडून जवळपास 16 लाख 50 हजार रुपये घेतले आणि नंतर तो अचानक गायब झाला.
आपली फसवणूक झाली असल्याची समजताच गौरी शर्मा हिने कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी या प्रकरणात तपास सुरू केला अखेर गुन्हा दाखल झाला आहे. ऑनलाइन फसवणुकीचा हा प्रकार असल्याने पोलीस तपास करीत आहे मात्र एका उच्च पदावर असलेल्या तरुणीला सोळा लाखाचा गंडा लावल्याने कल्याण मध्ये एकच खळबळ उडाली आहे. प्रश्न असा पण आहे की स्वतःला यूपीमध्ये एमडी डॉक्टर म्हणणारा प्रकाश शर्मा हा व्यक्ती अस्तित्वात आहे की नाही, फक्त नाव बदलू गौरी शर्मला या तरुणीला फसवणूक करण्यात आली आहे आता पोलीस तपासात सत्य समोर येईल
