जनतेज न्युज

येत्या काही दिवसांत फडणवीस मुख्यमंत्री होतील – नरेंद्र पवार ( कल्याण पश्चिम भाजप माजी आमदार )

प्रतिनिधी, कल्याण : राज्यात शिंदे विरुद्ध शिवसेना संघर्ष टोकाला पोहचला आहे .भाजपकडून देखील आता शिंदे गटाला सोबत घेत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्याचे बोललं जातंय .त्यातच आता भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी
काही दिवसातच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार असल्याची उघडपणे चर्चा सुरू केली आहे . कल्याण डोंबिवली महापालिकेत करोना काळात दोन वर्षे आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून काम करणाऱ्या कर्मचार्याना सेवेतून कमी करत पालिका प्रशासनाने दुसऱ्या संस्थेमार्फत कर्मचारी भरती केली आहे. याविरोधात या कर्मचार्यांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे. या उपोषण कर्त्याची माजी आमदार नरेंद्र पवार यांनी भेट घेतली यावेळी त्यांनी काही दिवसातच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील किंवा त्यांना महत्वाचं खातं मिळेल. फडणवीस मुख्यमंत्री होताच या कर्मचार्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले .त्यामुळे ऑपरेशन लोटस जवळपास पूर्ण झालं की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.