प्रतिनिधी , मुंबई : राज्यात सात ते आठ महिन्या नंतर मंदिर खुली करण्यात आली आहेत. गेले तीन महिने भाजप तसेच विविध राजकीय संघटना कडून मंदिर उघडण्यासाठी रस्त्यावर आंदोलन करण्यात आली होती. मात्र सरकारने तीन महिन्यात त्याकडे लक्ष दिल नाही . मात्र परवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारपासून मंदिर खुली करण्यासाठी परवानगी दिली. त्यामुळे भाजप कडून आज मुंबईत सिद्धिविनायक मंदिर परिसरात ढोल ताशे वाजवत गुलाल उडवीत जल्लोष करण्यात आला.
