प्रतिनिधी , यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात लहान बालकांना पोलिओ डोस समजून सॅनिटायझर पाजण्यात आले. ही गंभीर घटना आहे. भंडारा घटने पाठोपाठ यवतमाळ जिल्ह्यात बालकांच्या जीवाशी खेळ करणारी घटना घडली आहे. राज्यातील सरकार हे बालकांची हत्या करणारे सरकार आहे, असा घणाघाती प्रहार भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला.
जिल्हा शल्य चिकित्सक यांची चौकशी कमिटी भांबोरा प्रकारनात स्थापण करणे आवश्यक होते. मात्र असे कुठेही झाले नाही. त्यामुळे निलंबन कारवाई झाली असली तरी गुन्हा दाखल होऊ शकला नाही. राज्य सरकारने लहान मुलांच्या जीवांची किंमत निश्चित केली आहे काय, असा संताप जनक सवाल वाघ यांनी उपस्थित केला. जोपर्यंत बालकांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष स्वस्थ बसणार नाही, असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला.
