जनतेज न्युज

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत मणक्याच्या आजारावर उपचार शिबिर

प्रतिनिधी , लातुर : आज राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर शहरातील सह्याद्री हॉस्पिटल व सह्याद्री फाऊंडेशन यांच्या वतीने मोफत मणक्याच्या आजारावर शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी शिबाराचे उदघाटन केले आहे या शिबिरात डॉक्टर हनुमंत किणीकर यांनी मणक्याच्या रुग्णाची तपासणी व मोफत औषधे देण्याचा उपक्रम राबविला आहे दोन न्यूरो सर्जन व दोन ऑर्थोपेडिक सर्जन यांनी रुग्णाची तपासणी केली आहे यात रुग्णाला आवश्यक असणाऱ्या सर्व तपासण्या 50 % सवलती च्या दरात तर मोठे ऑपरेशन देखील 50% दरात रुग्णाला करून देत असून समाजातील गोरगरिबांना याचा मोठा फायदा होत आहे आजच्या शिबिरात 200 रुग्णानी सहभाग घेतला आहे