प्रतिनिधी , जळगाव : चोपडा तालुक्यातील एक लव्य संघटनेच्यावतीने चोपडा तहसील कार्यालयावर नाशिक विभाग म्हाडाचे चेरअमन शिवाजीराव ढवळे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला मोर्चेला प्रारंभ शासकीय विश्राम गृह येथून करण्यात आला चोपड्यात रिपरिप पावसातही हजारोच्या संख्येने आदिवासी समाजातील महिला पुरूष युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकाने मेन रोडाणे तहसील कार्यालयावर पोहचला याठिकाणी डॉ.चंद्रकांत बारेला, शिवाजीराव ढवळे यांनी या ठिकाणी मागण्या संदर्भात मार्गदर्शन केले त्यानंतर तहसीलदार यांच्या दालनात मागण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शिवाजीराव ढवळे डॉ.चंद्रकांत बारेला तहसीलदार अनिल गावित तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदिप लासुरकर नायब तहसीलदार सचिन बांबुळे पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे अभियंता आदिवासी विभागाचे प्रतिनिधी वार्डण हिलाल गायकवाड यांच्यासह एकलव्य संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते. तहसीलदार अनिल गावित यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी मोर्चेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
