प्रतिनिधी , औरंगाबाद : संगमनेर शहरासह तालुक्यात प्रसिध्द असनारी दुधगंगा पतसंस्था आज आखेर सुरू झाल्याने हजारो ठेवीदारांना दिलासा मिळालेला आहे. सर्वांचे पैसे सुरक्षीत असुन कोनाचेही पैसे संस्था बुडवणार नसल्याचे संस्थेचे चेरमन भाऊसाहेब कुटे यांनी सांगितले आहे. संगमनेर शहरात एक शाखा तालुक्याभरात चार शाखा अशा पाच शाखेंचा विस्तार असेल्या पंतसंस्थेचा मोठा गैरव्यवहार झाल्याची तालुक्यात अफवा पसरल्यामुळे ठेवीदारांनी पैसे काढन्यासाठी शाखेबाहेर गर्दी केली. त्यामुळे दुधगंगा पंतसंस्था आर्थिक आडचनीत आल्याचे चेरमन कुटे यांनी सांगीतले. ठेवीदारांना मुदती अगोदर पैसे मिळनार नसुन कर्जदारांना त्यांचे पैसे भरावेच लागतील असे त्यांना सांगत बचत खातेधारकांना दर महिन्याला पैसे काढता येतील असे कुटे यांनी सांगितले. तसेच संस्थेचा काही रूपयांचा गैरव्यव्हार झाला असल्याचे कुटे यांनी सांगितले मात्र दोषींवर कारवाई करून पैसे वसुल केले जातील कोन्हीही आफवांवर विश्वावर ठेवु नये असेही संस्थेचे चेरमन भाऊसाहेब कुटे यांनी सांगितले आहे.
