प्रतिनिधी , सोलापूर : राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत सोलापूर दौऱ्यावर असताना लेझीमच्या तालावर ठेका धरताना दिसून आले.सोलापूर शिवसेना शिंदे गटाचे नूतन जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या थोराला मंगळवेढा तालमीतील गणरायचं दर्शन घेतल्यानंतर आरोग्यमंत्री आपल्या सहकार्यांसोबत लेझीमच्या तालावर ठेका धरताना दिसून आले.तानाजी सावंत यांचा आरोग्यमंत्री पदाची सूत्र हाथी घेतल्यानंतरचा हा पहिलाच सोलापूर जिल्हा दौरा आहे.
