जनतेज न्युज

ठाकुर्ली दरम्यान कचोरे भागातील बाप्पांचा परतीचा प्रवास यंदा देखील रेल्वे रुळांवरूनच

प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : गणेश चतुर्थी पासून मनोभावे पूजा अर्चा करून आज पाच दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यात आला . कल्याण डोंबिवली शहरातील मधोमध असलेल्या ठाकुर्ली परिसर , 90 फिट रोड कचोरे ,खंबाल पाडा परिसरातील भाविकांच्या बाप्पांना यंदा देखील रेल्वे रूळ ओलांडून आपले स्थान गाठावे लागले. यावर माध्यमांनी अनेक वेळा प्रकाश टाकला आहे. त्याची दखल घेत यंदा महापालिका प्रशासनाने या परिसरात विसजर्नासाठी कृत्रिम विसजर्न तलावाची व्यवस्था करुन दिली आहे. तरी आज गणेश विसजर्नासाठी या परिसरातील गणोश भक्त हे रेल्वे रुळ पार करुन कल्याण खाडीत विसजर्न करण्यासाठी जात असल्याचे दिसून आले. कल्याण आणि ठाकुर्लीच्या दरम्यान असलेल्या कचोरे येथील विसर्जन घाटावर जाण्यासाठी रस्ता नाही ,या भागात पालिकेने कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिले नसल्याने अनेक वर्षापासून हा धोकादायक प्रवास सुरू होता .मात्र यंदा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून या भागात कृत्रिम तलवांची व्यवस्था करून दिली असली तरी नागरिकांनी रुळ ओलांडून बाप्पाच्या विसर्जनासाठी खाडी गाठली . त्यामुळे हा धोकादायक प्रवास थांबणार तरी कधी असा सवाल उपस्थित झाला आहे .दरम्यान या ठिकाणी सुरक्षेसाठी रेल्वे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता .विसर्जनादिवशी या ठिकाणी रेल्वे पोलीस सुरक्षा बल ,स्थानिक पोलीस , स्थानिक सागरदेवी सेवक मंडळच्या मदतीने गणेश भक्तांनी विसर्जन पार पाडले.