प्रतिनिधी , सोलापूर : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे सोलापूर शहरात जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी त्यांच्या हस्ते भय्या चौक बुबने चाळ येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले.तसेच राष्ट्रवादी युवक चे सोलापूर शहर उपाध्यक्ष प्रियदर्शन साठे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश देखील केला.या कार्यक्रमात तानाजी सावंत यांनी शिंदे गट , अमुक तट म्हणू नका म्हणत ही शिवसेना आमचीच म्हणजे एकनाथ भाऊंची शिवसेना आहे.आपल्या सगळ्यांची शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना आहे असे सांगितलंय. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे शिंदे गटाकडून सोलापुरात जंगी स्वागत करण्यात आले मात्र शिंदे गट , अमुक तट म्हणू नका म्हणत ही शिवसेना आमचीच म्हणजे एकनाथ भाऊंची शिवसेना आहे.आपल्या सगळ्यांची शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना आहे.ज्यांनी हिंदुतत्वाचे व्रत , विचार तुम्हा आम्हाला दिशा दिली.मार्गदर्शन केले.तो विचार कुणी तरी सोडला होता.तो विचार घेऊन आज आम्ही तुम्हा समोर येतोय.भविष्यात देखील तीच विचारधारा घेऊन आम्ही जनतेची सेवा करू असेही तानाजी सावंत यांनी सांगितलं.
