जनतेज न्युज

भाजप शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; घटनास्थळी खा. प्रीतम मुंडे दाखल

प्रतिनिधी, बीड : बीडचे भाजप शहराध्यक्ष भागीरथ बियाणी यांनी राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केलीय. सदरील घटना घरच्यांना कळताच त्यांनी बियाणी यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र यावेळेस डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. दरम्यान आता मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती कळताच खासदार प्रीतम मुंडे घटनास्थळी झाल्या आहे. बियाणी यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेले नाही मात्र या घटनेनंतर बीड शहरात एकच खळबळ माजली आहे. सध्या रुग्णालया बाहेर भाजप कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली.