प्रतिनिधी, बुलढाणा : महाराष्ट्राचे राज्यपाल हे पद प्रमुख सांविधानिक पद आहे.अशा पदावरच्या व्यक्तीने इतिहासाची माहिती न घेता अशा प्रकारचे वक्तव्य करणे अतिशय दुर्दैवी आहे..मी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करते.अशा प्रकारचं वक्तव्य करून त्यांनी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेचा अवमान केलेला आहे..त्यांनी या संदर्भात महाराष्ट्रातील तमाम जनतेची माफी मागितली पाहिजे.सातत्याने राज्यपाल हे अशा प्रकारची वक्तव्य करत असतात.छत्रपती शिवराय, फुले ,शाहू, आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या व्यक्तींच्या बलिदाना मधून हा महाराष्ट्र उभा राहिलेला आहे.मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे..या चळवळीमध्ये 107 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली..याची कुठलीही जाणीव न ठेवता अशा प्रकारचे वक्तव्य भगतसिंग कोश्यारी करत असतील तर ते अतिशय दुर्दैवी आहे. या लोकांनी मुंबई मोठी केली असं म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की मुंबईने आणि महाराष्ट्राने अनेक परप्रांतीयांना या ठिकाणी येऊन रोजगाराची संधी देऊन या लोकांच्या प्रगतीमध्ये योगदान दिलेलं आहे.. त्याबद्दल आपण खरं म्हणजे महाराष्ट्राचा आभारी असलं पाहिजे. मुंबई असेल किंवा महाराष्ट्र असेल याच्या जडणघडणीमध्ये इथला शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी आणि इथला सर्वसामान्य नागरिक गिरणी कामगार या सगळ्यांचा मोठे योगदान आहे ,ते मान्य केलं पाहिजे आणि त्यांनी तमाम जनतेची राज्यपाल यांनी माफी मागितली पाहिजे.
