प्रतिनिधी, नाशिक : नाशिककडे जाताना पडघा, शहापूर आणि इगतपुरी येथे त्यांच्या स्वागताचे कार्यक्रम पार पडले. नाशिकमध्ये घोटी टोल नाक्यापासूनच त्यांचं जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर शहरातील पाथर्डी फाटा येथे त्यांना भव्य हार घालून शहरात त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला त्यांनी अभिवादन केले..तर मुंबई नाका येथे हजारो लोकांनी रात्री 12 वाजता त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.
उद्या मुख्यमंत्री मालेगांव आणि नाशिक या शहरांबाबत आढावा बैठक घेऊन या दौऱ्याला।सुरुवात करणार आहेत.
