प्रतिनिधी, सोलापूर : बार्शी तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे. खेड्यापाड्यातील गावांना जोडणारे रस्तेही चिखलमय झाले आहे. त्यातून नागरिकांना गुडघाभर चिखलातून वाट काढून लागत आहे. नारी भातुंबरे या दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्याला अक्षरशा काटेरी झुडपांचे अतिक्रमण आणि रस्त्यावर गुडघाभर चिखल झाला आहे. त्यातून नागरिकांना रोजच्या येण जाण्याची वाट काढावी लागत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक व्यवहार फटका बसतो. जेष्ठ नागरिक महिला आणि विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी गुडघाभर चिखलातून वाट शोधावी लागतात. तरी हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही प्रशासनाने कानाडोळा केला आहे. शेवटी गावकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आपली व्यथा मांडली आहे.
