प्रतिनिधी, बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील फक्त १० टक्केच कार्यकर्त्यांनी बंडखोरी केलेली असून ९० टक्के शिवसैनिक हे उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत आम्ही शिंदे गटाला उमेदवार ही मिळू देणार नाही असा ठाम निर्धार जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिकांच्या शेगाव येथील बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयादी शिवसेनेने सुरू केल्याचं चित्र आहे. आजच बुलढाणा जिल्हा परिषदेच्या गटांच्या अरक्षणाचं चित्र स्पष्ट झालं असून यामुळे मात्र जिल्ह्यात आता आगामी निवडणुकीत बंडखोर विरुद्ध निष्ठावंत असा संघर्ष बघायला मिळू शकतो. जिल्ह्यातील शिवसैनिकांची शेगाव येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख व असंख्य शिवसैनिक या बैठकीला हजर आहेत.
