प्रतिनिधी , सोलापूर : दुसऱ्या महायुद्धावेळी चीनमध्ये अतुलनीय वैद्यकीय सेवा करणाऱ्या डॉ. कोटणीस यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी चीनच्या राजदूतांनी आज सोलापुरात डॉ. कोटणीस स्मारकास भेट दिली. दुसऱ्या महायुद्धावेळी जपानने चीनवर आक्रमण केलं असताना चीनला मोठ्या वैद्यकीय मदतेची गरज पडली. त्यावेळी भारतातून रुग्णसेवेसाठी गेलेल्या डॉक्टरांच्या पथकात सोलापूरचे डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा सहभाग होता. त्यांनी आपले प्राण धोक्यात घालून अनेक चिनी सैनिकांचे प्राण वाचवले. चार वर्ष चीनमध्ये वैद्यकीय सेवा बजावणाऱ्या डॉ. कोटणीस यांनी आपला अखेरचा श्वास देखील चीन मध्येच घेतला. त्यांच्या कार्याची आठवण ठेवत चीनचे राजदूत सन वेइडोंग यांनी आज कोटणीस स्मारकला भेट दिली.
