प्रतिनिधी, जळगाव : चोपडा तालुक्यातील आदिवासी भागातील ११ ग्रामपंचायत साठी काल मतदान घेण्यात आले होते. त्याची आज मतमोजणी प्रशासकीय इमारत येथे करण्यात आली. ११ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच पद ये जनतेतून निवडून द्यायचं असल्याने निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झालेली होती. ११ ग्रामपंचायतच्या ९९ सदस्य व ११ सरपंच पदासाठी निवडणूक जाहीर झालेली होती. त्यापैकी ४४ सदस्य हे बिनविरोध झाले होते. ५४ सदस्य व ११ सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आलेले होते. त्याची आज मतमोजणी सुरळीत व शांततेत पार पडली. या मतमोजणी कामी तहसीलदार अनिल गावित, निवडणूक नायब तहसीलदार सचिन बाबळे, प्रभारी नायब, तहसीलदार रवींद्र माळी , नरेंद्र सोनवणे यांच्यासह महसूल कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता.
