जनतेज न्युज

खासदार बाळु धानोरकर यांच्यावर गुन्हादाखल करण्यात यावा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची मागणी

प्रतिनिधी, नागपुर : काँग्रेसचे नेते व चंद्रपुरचे खासदार बाळु धानोरकर यांच्या तर्फे ब्राह्मण समाजावर टीका करताना शिवराळ भाषेचा उपयोग त्यांनी केलेला आहे. या विषयाच्या संदर्भातभारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते वरिष्ठ पोलीस निरिक्षक, धंतोली पोलीस स्टेशन यांना बाळु धानोरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणी करीता निवेदन देण्यात आले आहे.पोलिसांनी काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचा विरुद्ध कार्यवाही केली नाही तर भारतीय जनता युवा मोर्चा कडून अनोदलन करण्यात येईल असा इशारा ही युवा मोर्चाचे पीयूष लिंगायत यांनी दिला.