जनतेज न्युज

सततच्या पावसामुळं शेती पिकांचं नुकसान

प्रतिनिधी, जालना : जालना जिल्ह्यातील काही भागात सततच्या पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. जिल्ह्यात दररोज रिमझिम पाऊस पडतोय. त्यामुळं पिकं पिवळी पडू लागलीयेत. जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील पांगरी गोसावी सर्कलमधील शेकडो हेक्टर शेतात पाणी साचल्याचं बघायला मिळतंय. शेतातील सोयाबीन पिकात पाणी साचल्यानं पिकं सडू लागलीयेत. तर अनेक शेतातील कापूस पिवळा पडू लागला आहे त्यामुळं शेतकर्यांचं नुकसान झालं आहे. दरम्यान शेतातल्या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकर्यांनी केलीये.