जनतेज न्युज

महानगर पालिके विरोधात शहर विकास समितीचे ढोल बजाव आंदोलन

प्रतिनिधी, औरंगाबाद : स्मार्ट सिटीच्या नावाखाली एकीकडे शहराचा गौरव करायचा मात्र प्रत्यक्षात नागरी सुविधांकडे मनपा पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याने शहर विकास समितिच्या वतीने मनपा मुख्यालयाच्या समोर ढोल बजाव आंदोलन केले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध नागरी समस्यांनी डोके वर काढले असून नागरी समस्यांमुळे मोठ्या प्रमाणात अस्वच्छतेचा -रोगराईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.रस्त्यांची खराब अवस्था,पाणी पुरवठ्याचे ढसाळ नियोजन,ठिकठिकाणी गळक्या जलवाहिन्या,कचरा डेपो मुळे निर्माण झालेला आरोग्याचा प्रश्न,ठिकठिकाणी वाहत असलेले ड्रेनेज,मनपाच्या शिक्षण विभागाचा वाऱ्यावर असलेला कारभार ह्या सर्व समस्या डोकं वर काढत असताना मनपा प्रशासन हलायला तयार नसल्याने हे आंदोलन करण्यात आले आहे. हे मूलभूत प्रश्न जोपर्यंत सोडवल्या जात नाही तोपर्यंत झोपेचे सोंग घेतलेल्या मनपा प्रशासनाला जागे  करणार असल्याचे समितीचे समन्वयक अमोल दांडगे ह्यांनी सांगितले.