जनतेज न्युज

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त 2000 हेल्मेटचे वाटप

प्रतिनिधी, ठाणे : महाराष्ट्र मोटार वाहन विभाग आणि भारतीय स्टेट बँक यांच्या संयुक्त विद्यमाने व वागळे इस्टेट लॉरी ओनर्स अध्यक्ष विजय यादव यांच्या आयोजनाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजु लोकांना 2000 हेल्मेट वाटप करण्यात आले, ही एक अभिनव संकल्पना असून आपण सुरक्षित तर आपल कुटुंब सुरक्षित, यासाठी सगळ्या दुचाकी स्वारांनी हेल्मेट घालणे आवश्यक असून कायद्याचे योग्य ते पालन करण्यासाठी हा उपक्रम रबविण्यात आला. ह्या हेल्मेटचे वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या हस्ते करण्यात आले. या वेळी स्टेट बँकेचे महाप्रबंधक ,मनोज कुमार सिन्हा , उप महाप्रबंधक विबलेंदु विकास, सहाय्यक महाप्रबंदक , राजा कुंदनशरण , राकेश कुमार  उपस्थित होते.त र ठाणे परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी जयंत पाटील, मुबंई परिवहन विभागाचे जितेंद्र पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते.