प्रतिनिधी, बीड : बीडच्या माजलगावात महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन संघटनेने तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला. मागील सात महिन्यांपासून श्रावण बाळ योजनेतील लाभार्थी वृद्ध अनुदानापासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांचे हाल होत आहेत. वारंवार मागणी करून देखील तहसील प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने आज हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चादरम्यान भूमिहीन शेतमजुरांना दोन रुपये आणि तीन रुपये किलोच्या धान्यांचे वितरण तात्काळ सुरू करावे, यासह विविध मागण्यांसाठी निराधारांनी मोर्चात सहभाग घेतला. माजलगाव तालुक्यातील निराधार वृद्ध महिला पुरुष यात सहभागी झाले होते.
