प्रतिनिधी, सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्तीत आज मुस्लिम समाजातील मयताच्या अंत्यविधीसाठी हरणा नदीतील चक्क कमरे एवढ्या पाण्यातून आपले जीव धोक्यात घालून तारेवरची कसरत करत नदीच्या पलीकडे असणार्याी मुस्लिम कब्रस्तानात नेण्यात आले.
मागील महिन्यात याच नदीपात्रातून अशाप्रकारे जीव धोक्यात घालून मयत नेण्यात आले होते.ती घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा मुस्ती ग्रामस्थांना आपला जीव धोक्यात घालून अंत्यविधी उरकावा लागला आहे.हीच हरणा नदी ओलांडून जाताना एका युवकाला कांही महिन्यांपूर्वी आपल्या प्राणाला मुकावे लागले.अशा दुर्घटना वारंवार घडू नये म्हणून ग्रामस्थांनी हरणा नदीवर पूल बांधण्यासंबंधी वारंवार प्रशासनाकडे मागणी करुनसुध्दा प्रशासनाला याबाबत गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.
