जनतेज न्युज

| राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर नांदेड येथे काँग्रेसची बैठक

प्रतिनिधी, नांदेड : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर नांदेडात काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या यपस्थितीत ही बैठक पार पडली. नांदेड येथून सात नोव्हेंबर पासून देगलूर तालुक्यातून ही यात्रा सुरू होऊ शकते अशी प्राथमिक माहिती अशोक चव्हाण यांनी दिली. त्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी नांदेड जिल्ह्यात जवळपास शंभर किलोमीटर अंतर कापणार आहेत. भारत जोडो यात्रेसाठी जयंत तयारी करण्याच्या सूचना चव्हाण यांनी कार्यकर्त्याना दिल्या. यावेळी अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या दडपशाहिवर देखील टीका केली. पत्रकारांनी भाजपा प्रवेशा बाबत चव्हाण यांना विचारलं असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.