जनतेज न्युज

राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

प्रतिनिधी, कोहलपुर : आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान मिळावे म्हणून माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित दाखवली.महाविकास आघाडी सरकारने नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचे अनुदान देण्याची घोषणा केली होती मात्र हे सरकार पडल्यानंतर नवीन आलेल्या शिंदे सरकारने हा निर्णय रद्द केला आहे. निर्णयासाठी अर्थ संकल्पात 10 हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती मात्र हा निर्णय रद्द झाल्यामुळे हा निधी हे सरकार दुसरीकडे वळणार असल्याचा मोठा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी या धडक मोर्चावेळी केला. आता स्वाभिमानी ची नवीन पाटी असेल,”येथे विद्यमान खासदार आणि माजी आमदार यांच्याकडून काम करून घेतलं जाईल.” स्वाभिमानीकडून आंदोलनाचा इशारा आणि तारीख दिली जाईल बाकी पाठपुरावा वरील लोक करतील. असेही खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी जाहीर केले.

आज दिवसभर पावसाची संततधार असतानासुद्धा या धडक मोर्चाला लाखोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.